Borivali MHADA Housing Project : मुंबईत स्वतःचं हक्काचं घर असावं, हे प्रत्येक सर्वसामान्य माणसाचं स्वप्न असतं. पण वाढत्या महागाईत आणि गगनाला भिडणाऱ्या घरांच्या किमतींमुळे हे स्वप्न पूर्ण करणं अनेकांना केवळ अशक्यच वाटतं. अशा वेळी ‘म्हाडा’ (MHADA) हीच गोरगरिबांसाठी एक मोठा आशेचा किरण ठरते. जर तुम्हीही कमी बजेटमध्ये आणि अत्यल्प उत्पन्न गटात (EWS) मोडत असाल, तर तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे! मुंबईत, विशेषतः बोरिवलीसारख्या मोक्याच्या ठिकाणी म्हाडा एक महाकाय गृहप्रकल्प घेऊन येत आहे. हा प्रकल्प सर्वसामान्यांसाठी एक मोठा दिलासा ठरणार असून, आज आपण याच बहुचर्चित ‘PMAY’ प्रकल्पाबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
अत्यल्प उत्पन्न गटासाठी (EWS) मोठा दिलासा!
गेल्या काही वर्षांपासून म्हाडाच्या लॉटरीमध्ये अत्यल्प उत्पन्न गट (EWS) कुठेतरी दुर्लक्षित होत असल्याचं चित्र होतं. म्हाडाच्या मुंबईतील लॉटरीत या गटासाठी घरांची संख्या तुलनेने खूपच कमी असायची, तरीही या गटातील लोक पूर्णपणे म्हाडावरच अवलंबून असतात. आता याच समस्येची दखल घेत, म्हाडाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्यांना खरंच परवडणाऱ्या घरांची गरज आहे, त्यांच्या हक्काच्या घरासाठी आता बोरिवलीत एक भव्य प्रकल्प उभा राहणार आहे.
पहाडी गोरेगावच्या यशानंतर आता ‘PMAY २’
तुम्हाला आठवत असेलच, २०२३ मध्ये गोरेगावच्या पहाडी भागात म्हाडाने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (PMAY Phase 1) २००० घरांची लॉटरी काढली होती. अवघ्या ३० लाखांत १BHK घर देणारा हा प्रकल्प सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये असल्याने अक्षरशः ‘सुपरहिट’ ठरला होता. पण त्यानंतर २०२४-२६ या काळात अत्यल्प गटासाठी असा कोणताही मोठा प्रकल्प आला नाही. आता त्याच धर्तीवर ‘PMAY २’ अंतर्गत बोरिवलीत हा नवा गृहप्रकल्प साकारला जाणार आहे.
प्रकल्पाची व्याप्ती: चक्क साडेचार हजार घरे!
होय, तुम्ही अगदी बरोबर वाचत आहात! हा प्रकल्प १ किंवा २ हजार घरांचा नसून, तब्बल ४,००० ते ४,५०० घरांचा असणार आहे. बोरिवलीतील शिंपोली भागात ही घरे बांधली जातील. विशेष म्हणजे, यासाठी बीएसएनएल (BSNL) ची ४१ एकर आणि एमटीएनएल (MTNL) ची २५ एकर अशी एकूण ६६ एकर जागा उपलब्ध झाली आहे.
कामाची सद्यस्थिती काय?
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, या प्रकल्पासाठी नुसती घोषणा झालेली नाही, तर प्रत्यक्ष व्यवहाराला सुरुवातही झाली आहे. जमिनीच्या हस्तांतरणासाठी आवश्यक असणारी तब्बल १२५ कोटी रुपयांची अनामत रक्कम (Token Amount) देखील जमा करण्यात आली आहे. आता ही जागा हस्तांतरित करून महा-हाऊसिंग आणि म्हाडाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
सध्या सुरू असलेल्या म्हाडाच्या मुंबई लॉटरीत ईडब्ल्यूएस (EWS) साठी असलेल्या अवघ्या १३ घरांनाही प्रचंड प्रतिसाद मिळतोय. यावरूनच सर्वसामान्यांना अशा घरांची किती नितांत आवश्यकता आहे, हे स्पष्ट होते. हा नवीन बोरिवली प्रकल्प या सर्वांना मोठा दिलासा देईल यात शंका नाही.
येथे वाचा – म्हाडाची घरं स्वस्त होणार; हा खर्चही होणार कमी, म्हाडाचा मोठा प्लॅन तयार
सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि अत्यल्प उत्पन्न गटाला न्याय देण्यासाठी म्हाडा आणि शासनाने उचललेले हे पाऊल खरोखरच कौतुकास्पद आहे. या निर्णयामुळे हजारो कुटुंबांचे मुंबईत हक्काचे घर घेण्याचे स्वप्न साकार होईल!

Hi, I am Santosh Kale Patil, the Founder and Chief Editor of Property विशेष. As a dedicated digital content creator and real estate journalist from Maharashtra, I specialize in providing authentic updates on MHADA lotteries, CIDCO lotteries, and vital property news. My primary mission is to empower homebuyers and citizens by delivering timely, accurate, and fact-checked information.
Pl lottery no takaych
Senior Citizen sathi kahi savalat milnar asel tar, MHADA Chi far mothi madat milel.
खूप खूप आभार या दिलासा दाहक अपडेट साठी.परंतु हा प्रकल्प अतिविशाल असल्याने आणखी दहा बारा वर्षांनी पूर्ण होणार असेल तर त्याला कांही अर्थ नाही.काय म्हणता?
या प्रकल्पातील घरे लॉटरीसाठी उपलब्ध होण्यासाठी साधारणपणे ३ ते ५ वर्षांचा कालावधी लागू शकतो.
My name is Viral Thakkar , born and bought up in Mumbai.
Currently staying on rent from past many years.
In need of my own house in Mumbai.
Aamha Garib lokana nahi lagat, Aamhi notice kele, jyanchakade ghare aahet tyanach mhadachi ghare lagatat, Aamhi 5 varsh lotery cha form bharala, darvarchi aamache paise fukat gele, certificate banava etyadi vaigare kay fayada zala, jyana pahili ghare lagali aahet tyanach lagat aahet
I am staying rented house I want my own house at Borivali. How to apply let me know. Please reply me.
कधी फॉर्म भरायचे चालू होणार आहे ते कळवावे
मी सिनीयर सिटुझन असून मी निराधार आहे पण जन्म पासून ते आता पर्यंत ६५ वर्षे मुंबई ते आहे मी एकटीच आहे तरी कमी बजेटमध्ये छोटे घर उपलब्ध होऊ शकेल का प्लीज मला माहिती पाठवा
माझ्या कडे Domicile certificate nahi aani te banvayla gele tar Borivali Election vibhag at sangitle ki Aamhi ३ te ४ magne voting utara denyas band keley aani tya utaryashivay Domicile certificate minar nahi majhi khup ichha aahe. Mi gele २१ varshe भाडे तत्त्वावर राहत आहे. Rent भरायचे kahi vaatat nahi pan dar २-३ varsha I te ghar sodne jad jaate.